‘गिरिप्रेमी’च्या जितेंद्र गवारेंकडून ‘मनास्लू’ शिखरावर चढाई, सहा महिन्यांत तीन अष्टहजारी हिमशिखरे सर

पुणे : पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी मंगळवारी (२८ सप्टेंबर) जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर ‘मनास्लू’ सर केले. दरम्यान, जितेंद्र यांनी गेल्या सहा महिन्यांत माउंट अन्नपूर्णा-१, माउंट एव्हरेस्ट आणि आज माउंट मनास्लू अशी तीन अष्टहजारी हिमशिखरे सर करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
UPSC third topper Ananya Reddy
पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये तिसरे स्थान! पाहा, कशी केली अनन्या रेड्डीने परीक्षेची तयारी…
kalyan, dombivali, Slow Progress, Palawa Chowk Flyover, Concerns, mns mla raju patil, criticise kdmc and mmrda, political interferance, x social media, dr srikant shinde, bjp, ravindra chavhan, mahrashtra politics, lok sabha 2024,
मनसेचे राजू पाटील म्हणतात, जगातील दहावे आश्चर्य डोंबिवलीत
Shivsena Thane, BJP alliance candidate Thane,
अन् महायुतीचा मुहूर्त चुकला, ठाण्यातील स्वागत यात्रेत यंदा शिवसेना भाजप युती उमेदवाराविनाच

‘मनास्लू’ हे शिखर नेपाळमधील गोरखा भागामध्ये स्थित आहे. याची उंची ८१६३ मीटर असून ते जगातील आठव्या क्रमांकाचे शिखर आहे. हा पर्वत ऊर्जेचा स्रोत आणि स्फूर्तिदायक म्हणून ओळखला जातो. याचे मनास्लू हे नाव संस्कृत भाषेतून आले असून याचा अर्थ ‘बुद्धिजीवी’ असा होतो.

चढाई करताना येणारे सर्व अडथळे पार करत जितेंद्र यांनी मंगळवारी सकाळी मनास्लू शिखराचा माथा सर केला. मनास्लूवर आजवर फार कमी भारतीय गिर्यारोहकांनी यश मिळवलेले आहे. गवारे यांना ज्येष्ठ गिर्यारोहक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले.

नवा विश्वविक्रम

वैद्यकीय भाषेत आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर मानवी शरीर फारसे तग धरू शकत नाही. जगात अशी १४ शिखरे आहेत, ज्यांची उंची ८ हजार मीटरहून अधिक आहे. ही सर्व हिमालयामध्ये असून त्यांना अष्टहजारी हिमशिखरे असे संबोधतात. अनेक गिर्यारोहकांनी या शिखरांवर चढाई करण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. जितेंद्र यांनी या १४ मधील माउंट अन्नपूर्णा -१, माउंट एव्हरेस्ट आणि आज माउंट मनास्लू अशी तीन अष्टहजारी हिमशिखरे केवळ सहा महिन्यात सर करत नवा विश्वविक्रम प्रस्तापित केला आहे.

जितेंद्र हा तयारीचा गिर्यारोहक असून, त्याची मानसिक आणि शारीरिक तंदरुस्ती वाखाणण्याजोगी आहे. सहा महिन्यांमध्ये तीन अष्टहजारी शिखरे सर करण्याची त्याची क्षमता थक्क करणारी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत हिमालयातील विविध शिखरांवर यशस्वी चढाई करून भारतीय तिरंगा फडकविण्याचे ‘गिरिप्रेमी’चे उद्दिष्टय़ आहे.

– उमेश झिरपे, ज्येष्ठ  गिर्यारोहक