पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गांधीवाद आणि अर्बन नक्षलवाद यातील फरक समजत नाही. शहरी नक्षलवाद अशी कोणतीही संकल्पना नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने लेखी स्वरूपात दिले आहे. मात्र भारत जोडो अभियानातील सहभागी संघटना नक्षलवादी असल्याचा आरोप फडणवीस करत आहेत. त्यामुळे ‘भारत जोडो’ अभियानातील सहभागी कोणत्या संघटना नक्षलवादी आहेत, याची यादी फडणवीस यांनी जाहीर करावी, असे आव्हान ‘भारत जोडो’ यात्रेचे योगेंद्र यादव यांनी येथे दिले.

योगेंद्र यादव यांची काँग्रेस भवन येथे रविवारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. अभियानाच्या उल्का महाजन, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यावेळी उपस्थित होते.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा – पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले

‘देशातील लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात असल्याने भारत जोडो अभियान हाती घेण्यात आले आहे. या माध्यमातून वेळप्रसंगी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही काही मुद्द्यांवर विरोध करण्यात आला आहे. मात्र लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे निश्चित करण्यात आले आहे,’ असे यादव यांनी सांगितले.

‘राज्य घटना बदलण्याच्या भाजपच्या हेतूला लोकसभा निवडणुकीतील निकालाने काही प्रमाणात धक्का बसला. हरियाणातील विजयानंतर लोकसभेचे अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. आत्ताही राज्य घटना बदलण्याचा भाजपचा हेतू कायम आहे. फडणवीस यांचे राहुल गांधी यांच्याबाबतचे विधान त्याचाच भाग आहे. ‘एक देश एक निवडणूक’ अशा संकल्पना राबवून राज्यघटना बदलण्याचे भाजपचे छुपे प्रयत्न सुरू आहेत. भाजपला लाल आणि निळा रंग वर्ज्य आहे. त्यामुळेच या निवडणुकीत भाजपला राज्यघटनेचा मुद्दा नको असून योजनांच्या माध्यमातून पैसे फेकून हा मुद्दा दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ असे यादव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका

भारत जोडो अभियान नक्षलवादी आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या आणि गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना गांधीवाद आणि नक्षलवाद यातील फरक समजत नाही किंवा त्यांना तो जाणून घ्यायचा नाही. शहरी नक्षलवाद अशी संकल्पना नाही, असे अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्रालयानेच लेखी दिले आहे. मात्र पराभवाच्या भयापोटी भाजपकडून शहरी नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. भारत जोडो अभियानातील सहभागी संघटना नक्षलवादी असतील, तर त्यांच्या नावांची यादी फडणवीस यांनी जाहीर करावी, अशी मागणी यादव यांनी केली.

भविष्यवाणी नाही तर, भविष्य बदलण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत योगेंद्र यादव यांनी अंदाज वर्तविला होता. तो खरा ठरला होता. मात्र, हरियाणा निवडणूक निकालाचा त्यांचा अंदाज चुकला होता. त्यामुळे राज्यातील निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी सत्तेत येणार, याबाबतचा अंदाज काय, अशी विचारणा त्यांच्याकडे केली असता भविष्यावाणी करणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतरही तसे जाहीर केले होते. मी भविष्य सांगणारा नाही तर लोकांचे भविष्य बदलणे हेच माझे काम आहे. महायुतीचे सरकार लूट, झूट, फूट ही निती अवलंबिणारे सरकार आहे. योजनांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पैशांचा धोका दाखवून देण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही यादव यांनी सांगितले.

Story img Loader