आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाचीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत योगी निरंजन नाथ यांची प्रमुख विश्वस्त पदी तर डॉ. भावार्थ देखणे यांची ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आल्याची घोषणा माजी प्रमुख विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप यांनी केली.

डॉ. भावार्थ देखणे, ऍड. राजेंद्र उमाप व योगी निरंजन नाथ यांची गतवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाचीच्या विश्वस्त पदी निवड झाली. ऍड. राजेंद्र उमाप यांनी प्रमुख विश्वस्त म्हणून तर योगी निरंजन नाथ यांनी पालखी सोहळा प्रमुख म्हणून गतवर्षी पदभार स्वीकारला. आळंदी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत यंदाच्या प्रमुख विश्वस्त पदी योगी निरंजन नाथ तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख पदी डॉ. भावार्थ देखणे यांची नेमणूक झाल्याची माहिती माजी विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप व संस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी पत्रकाद्वारे दिली.

Rahul Kamble wins Mahavitaran Shri in bodybuilding competition pune print news
शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : आणीबाणी ते कलाकारांवर बंदी! नरेंद्र मोदींनी ‘हे’ पाच मुद्दे उपस्थित करत काँग्रेसला करुन दिली संविधानाची आठवण
Hemant Dhome Post About Rahul Solapurkar
Hemant Dhome : राहुल सोलापूरकरांच्या शिवरायांविषयीच्या वक्तव्याबाबत हेमंत ढोमेची पोस्ट, “स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सूज्ञांनी…”
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
Tarkatirtha Laxman Shastri Joshi Marxs Hindi Ancestor
तर्कतीर्थ विचार: मार्क्सचे हिंदी पूर्वज
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

आणखी वाचा-पिंपरी महापालिकेचे ‘व्हीजन @५०’ ; भविष्यातील समस्या आणि उपाययोजनांवर सहा आठवडे गटचर्चा

योगी निरंजन नाथ यांनी योगी शांतीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आहे. तसेच एक साधक म्हणून अनेक वर्षे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात त्यांनी सेवा रुजू केली आहे. डॉ. भावार्थ देखणे यांच्या घरी वारकरी संप्रदायाची परंपरा असून वडील डॉ. रामचंद्र देखणे यांची धुरा पुढे नेत असताना ते एक वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार, निरूपणकार व व्याख्याते म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

Story img Loader