पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील एका माॅलमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या एका तरुणाच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा. पुण्यात ओशोंच्या अनुयायांचा धुडगूस, आश्रमाचा गेट तोडून अनुयायी आत घुसले, पोलिसांचा लाठीचार्ज हेही वाचा. उसाच्या पाचटाला आग लावली, शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान तक्रारदार महिला सेनापती बापट रस्त्यावरील एका माॅलमध्ये खरेदीसाटी आली होती. माॅलमध्ये खरेदी करुन महिला वाहनतळाकडे निघाली होती. जिन्यावरुन निघालेल्या तक्रारदार महिलेकडे पाहून तरुणाने अश्लील शेरेबाजी केली. महिलेने त्याच्याकडे रागाने पाहिले. तेव्हा अश्लील शेरेबाजी करणारा तरुण पसार झाला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून पसार झालेल्या तरुणाचा शोध घेण्यात येत असून माॅलमधील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळण्यात येत आहे.सहायक पाेलीस निरीक्षक संतोष कोळी तपास करत आहेत.