पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी व्हिडिओ केला रेकॉर्ड

पत्नी आणि सासू या तरुणाला काही महिन्यापासून सतत मानसिक त्रास देत होत्या.

Young man commits suicide after being harassed by his wife and mother in law
(प्रातिनिधीक छायाचित्र)

पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील लोणी काळभोर परिसरात राहणार्‍या २८ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नी आणि सासू या तरुणाला काही महिन्यापासून सतत मानसिक त्रास देत होत्या. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे.

रोहित सुनील पवार वय (२८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार आणि रेश्मा यांच्या लग्नाला आठ वर्ष झाली. त्यांना एक मुलगादेखील आहे. त्या दोघांमध्ये सतत क्षुल्लक कारणावरून वाद होत होते. पत्नी रेश्मा आणि सासू लता चव्हाण या रोहितला काही महिन्यापासून सतत मानसिक त्रास देत होत्या. वारंवार त्रास सहन करावा लागत असल्याने रोहित तणावाखाली होता.

पती रोहित आणि पत्नी रेश्मा या दोघांमध्ये ८ सप्टेंबर रोजी यावरून जोरदार भांडण झाले. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून रोहितने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी रोहितने एक व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मयत रोहित यांचे वडिल सुनील पवार यांनी (सून) रेश्मा पवार आणि लता चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दिली. त्या तक्रारी नुसार त्या दोघीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लोणी काळभोर पोलिसानी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Young man commits suicide after being harassed by his wife and mother in law abn 97 svk