पुणे : प्रेयसी फसवत असल्याची भावना आणि तिच्या मामाने धमकावल्याने तरूणाची आत्महत्या!

तरुणी आणि तिच्या मामा विरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

प्रेयसी फसवत असल्याची भावना आणि तिच्या मामाने दिलेल्या धमकीने, पुण्यातील कोथरूड भागात राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्या तरूणाने सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती, ती देखील आढळून आली आहे. याप्रकरणी ती तरूणी आणि तिच्या मामा विरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील तरूणीचे एका तरुणी सोबत प्रेमसंबंध होते. मात्र, ती आपल्याला सोडून जाईल, ही भावना त्याच्या मनात सतत येत होती. त्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद देखील होत होते. त्याच दरम्यान त्या तरुणीच्या मामाला त्या दोघांमधील प्रेम संबंधाबाबत माहिती मिळाली. त्यावरून त्या मामाने संबंधित तरूणाच्या घरी जाऊन शिवीगाळ करत, तू तिचा नाद सोड अशी धमकी दिली. या सर्व प्रकरणानंतर ती आपल्याला सोडून जाईल अशी भावना, तरूणाच्या मनात आली आणि त्याने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच त्यापूर्वी प्रशांतने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यावरून याप्रकरणी संबंधित तरुणीवर आणि तिच्या मामा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Young man commits suicide by cheating on his girlfriend msr 87 svk

Next Story
काढणीला आलेला कांदा पाण्यात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी