पुणे : पुणे शहरात गेल्या तीन दिवसात तीन खून झाले सत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर मध्यरात्री गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात मोक्कातून जामीनावर बाहेर आलेल्या गुंडांनी तरुणावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भावाला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार करण्यात आले. या घटनेत त्याचा मृत्यु झाला. सुनील सरोदे (वय २०, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोक्कातून जामिनावर सुटलेल्या रोहन कांबळे, साहिल कांबळे आणि साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. हे ही वाचा.चिंचवड विधासभेवरून अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्यात समझोता; शंकर जगताप निवडणूक लढवणार? पूर्वैमनस्यातून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुनील सरोदे हा डायस प्लॉट येथे राहतो. त्याचा भाऊ आणि आरोपीची भांडणे झाली होती. साहिल कांबळे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर पोलीसकडून साहिल कांबळेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार होती. कारवाई पूर्वी त्याने डायस प्लॉट परिसरात मध्यरात्री दहशत माजविली. हे ही वाचा.पुणे : धक्कादायक एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून जीवे मारण्याचा प्रयत्न, गजबलेल्या गणेश पेठेतील घटना; आरोपी अटकेत रोहन कांबळे, साहिल कांबळे हे साथीदारासह सुनिल सरोदे याला मारण्यासाठी डायस प्लॉट परिसरात आले होते. ते भावाला मारत असताना सुनिल सरोदे हा त्याला वाचविण्यासाठी मध्ये पडला. तेव्हा सुनिल याच्या मानेवर चाकूचा वार करण्यात आला. मानेची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाच जणांना अटक केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.