लोणावळ्यातील नागफणी पॉईंट येथील घनदाट जंगलात २४ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. फरान सेराजुद्दीन अस बेपत्ता झालेल्या तरुणाच नाव असून तो दिल्ली येथील राहणारा आहे. तो काही कामानिमित्त पुण्यात आला होता. तिथून लोणावळ्यात आला आणि एकटाच नागफणी पॉईंट येथे फिरण्यास गेला. जाताना तो ज्या रस्त्याने गेला तो रास्तच विसरला, आपण चुकलो अस समजताच त्याने भाऊ आणि आई वडिलांना फोन, मॅसेज करून याची कल्पना दिली होती. अशी माहिती लोणावळा शहर पोलीस देत आहेत.

फरान सेराजुद्दीन हा एका रोबोट कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. तो शुक्रवारी पुण्यात आला होता, तिथून त्याने लोणावळा गाठलं. फरान नागफणी पॉईंट येथे एकटाच फिरण्यास गेला. परंतु, फरान ज्या रस्त्याने गेला तोच रस्ता चुकला. त्याने तात्काळ भाऊ, आई, वडील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. याबाबत त्याने माहिती दिली, लोणावळा पोलिसांशी कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत फरान चा मोबाईल बंद झाला होता. अशी माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिलीय. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून फरान बेपत्ता आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्याला शोधणाऱ्यास १ लाखांच बक्षीस कुटुंबीयांनी जाहीर केलं आहे.

Nashik, Fraud with grape producers,
नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
Property worth lakhs was robbed in two house burglaries in nashik
नाशिक : जिल्ह्यात दोन घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
Theft in mall in Pune gang from Rajasthan was arrested
विमानाने येऊन पुण्यातील मॉलमध्ये चोरी… राजस्थानातील टोळी गजाआड

त्याचा शोध घेण्याच लोणावळा शहर पोलिसा पुढे मोठं आव्हान

लोणावळा शहर पोलिसांच पथक फरान चा शोध घेत आहे. त्यांच्या सोबतीला कुरवंडे गाव चे ग्रामस्थ, तरुण आहेत. तसेच, डॉग स्कॉड, एटीएस स्टाफ, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे, रेक्यु टीम खोपोली, शिवदुर्ग हे सर्व त्याचा शोध घेत आहेत. घनदाट जंगल, खोल दरी असल्यामुळं त्याचा शोध घेणे मोठं आव्हान आहे.