लोणावळ्यातील नागफणी पॉईंट येथील घनदाट जंगलात २४ वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. फरान सेराजुद्दीन अस बेपत्ता झालेल्या तरुणाच नाव असून तो दिल्ली येथील राहणारा आहे. तो काही कामानिमित्त पुण्यात आला होता. तिथून लोणावळ्यात आला आणि एकटाच नागफणी पॉईंट येथे फिरण्यास गेला. जाताना तो ज्या रस्त्याने गेला तो रास्तच विसरला, आपण चुकलो अस समजताच त्याने भाऊ आणि आई वडिलांना फोन, मॅसेज करून याची कल्पना दिली होती. अशी माहिती लोणावळा शहर पोलीस देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फरान सेराजुद्दीन हा एका रोबोट कंपनीत अभियंता म्हणून काम करतो. तो शुक्रवारी पुण्यात आला होता, तिथून त्याने लोणावळा गाठलं. फरान नागफणी पॉईंट येथे एकटाच फिरण्यास गेला. परंतु, फरान ज्या रस्त्याने गेला तोच रस्ता चुकला. त्याने तात्काळ भाऊ, आई, वडील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला. याबाबत त्याने माहिती दिली, लोणावळा पोलिसांशी कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत फरान चा मोबाईल बंद झाला होता. अशी माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिलीय. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून फरान बेपत्ता आहे. त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. त्याला शोधणाऱ्यास १ लाखांच बक्षीस कुटुंबीयांनी जाहीर केलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man missing dense forest lonavala family has set a reward lakh researcher amy
First published on: 23-05-2022 at 21:58 IST