दुभाजकाला गाडी धडकल्याने दुचाकीवरील तरूणाचा मृत्यू

अगरवाल हा मूळचा भुसवाळ येथील रहिवासी असून तो त्याच्या आत्याला भेटण्यासाठी बालेवाडीला आला होता

accident
(प्रतिनिधिक छायाचित्र)

पुणे :  नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री कोरेगाव पार्क परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मेहूल महेंद्र अगरवाल (२६, रा. बालेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत दुचाकीचालक हर्ष देशमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोरेगाव पार्क परिसरातील नॉर्थ मेन रस्त्यावर रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

अगरवाल आणि देशमुख एका दुचाकीवरून जात होते. त्यावेळी देशमुख हा गाडी चालवत होता. नॉर्थ मेन रस्त्यावर देशमुखचा ताबा सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकली. यात गंभीर जखमी झालेल्या अगरवाल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, देशमुख हा देखील जखमी झाला आहे. 

अगरवाल हा मूळचा भुसवाळ येथील रहिवासी असून तो त्याच्या आत्याला भेटण्यासाठी बालेवाडीला आला होता. याप्रकरणी चालक देशमुखव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young man on two wheeler dies after being hit on divider print pune news zws

Next Story
‘जेमकोव्हॅक १९’ लस उपलब्ध; भारतातील पहिली एमआरएनए लस, डीसीजीआयची मान्यता
फोटो गॅलरी