लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सराइताने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. नागेश आनंदा वांजळे (वय ३४, रा. देवगिरी कॉलनी, गणपती माथा, एनडीए रस्ता, वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

वांजळे याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चांगदेव उर्फ पप्पू अशोक वांजळे (वय ३७, रा. देवगिरी कॉलनी, गणपती माथा, एनडीए रस्ता, वारजे माळवाडी) याला अटक करण्यात आली. याबाबत नागेश वांजळे यांची आई कमल (वय ५८) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-लोकजागर : सांस्कृतिक म्हणजे काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश आणि आरोपी चांगदेव यांच्यात वाद झाला होता. चांगदेव याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नागेश ते राहत असलेल्या इमारती जवळ थांबले होते. त्या वेळी चांगदेव तेथे आला. त्याने नागेश यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. आरोपीने त्यांना माराहण करुन कोयत्याने वार केले. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करत आहेत.

Story img Loader