पुणे : थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून खून ; यशवंत साखर कारखान्याच्या आवारात मृतदेह

थेऊरमधील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

CRIME
(प्रातिनिधिक छायाचित्र)

थेऊरमधील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून झालेल्या तरुणीची ओळख पटलेली नाही.

यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा मृतदेह दिसल्याची माहिती नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तरुणीच्या डोक्यात दगड मारुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. तरुणीच्या चेहऱ्यावर दगड मारण्यात आल्याने तिची ओळख पटू शकलेली नाही. तरुणीच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young woman stoned to death in theur pune print news amy

Next Story
पुणे : गंधर्व नाटक मंडळीच्या सुवर्णस्मृतींना ‘सावतामाळी भवन’मध्ये उजाळा
फोटो गॅलरी