scorecardresearch

Premium

पुणे: पार्टीवरुन घरी निघालेल्या तरुणीवर मदतीच्या बहाण्याने बलात्कार

विमाननगर भागात एका उपाहारगृहात पार्टी करुन घरी निघालेल्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

young woman was raped by man
दत्तात्रय खरात (वय २८, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विमाननगर भागात एका उपाहारगृहात पार्टी करुन घरी निघालेल्या तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

solapur rape victim girl, rape victim girl attacks on police constable
बलात्कार खटल्यात आरोपीला जामीन; संशयावरून पीडितेने दिली हवालदाराची सुपारी
tanker driver, car accident, vasai
वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू
bhandara murder, bhandara criminal naim shaikh murder case, infamous criminal naim shaikh murdered by his enemy
कुख्यात नईमच्या खुनाचा उलगडा; वर्षांपूर्वी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा बदला
Bike theft by changing costume
चोरट्याची शक्कल… दुचाकी चोरल्यावर तो बदलायचा आठ ते दहा शर्ट!

दत्तात्रय खरात (वय २८, रा. विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३२ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागात बॅकयार्ड कॅफे आहे. तरुणी, तिची मैत्रीण, दोन मित्र गुरुवारी रात्री पार्टी करण्यासाठी तेथे गेले होते. उपाहारगृहात दहा हजार रुपयांचे बिल झाले. तरुणीने डेबिट कार्डद्वारे बिल अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डेबिट कार्डच्या सांकेतिक शब्दात चूक झाल्याने बिल अदा होऊ शकले नाही. त्यानंतर उपाहारगृहातील व्यवस्थापक आणि कामगारांनी तरुणीला शिवीगाळ करुन दोन मोबाइल संच, पॅनकार्ड, आधारकार्ड, डेबीट कार्ड ताब्यात घेतले. बिल भरल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू परत करेल, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-सिंहगड रस्त्यावर उपाहारगृहचालकाचा खून; वैमनस्यातून खून झाल्याचा संशय

त्यानंतर तरुणी उपाहारगृहात थांबली. त्यावेळी उपाहारगृहातील एका ग्राहक तरुणाने तरुणीला मदत करण्याचा बहाणा केला. तरुणीला घरी सोडण्याचा बहाणा करुन खराडी भागातील एका हॉटेलमध्ये नेऊन तरुणीवर त्याने बलात्कार केला. तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी खरात याला अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young woman was raped by man who pretext of helping her pune print news rbk 25 mrj

First published on: 30-09-2023 at 11:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×