आभासी चलनात केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळत नसल्याच्या वादातून तरुणाचे जंगली महाराज रस्ता परिसरातून अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तरुणाला फलटणमधील एका हॉटेलमध्ये रात्रभर डांबून ठेवण्यात आले.

याबाबत समीर दस्तगीर काझी (वय ४०, रा. श्रीनाथ सोसायटी, थेरगाव, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अजिंक्य प्रताप कदम, वैभव भारत कदम, श्रेयस कदम, राहुल निंबाळकर, मनोज भगत, अभिमन्यू घनवट (सर्व रा. फलटण, जि. सातारा)यांच्यासह तीन साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयित आरोपींनी जर्मनीतील डिजिटल टेक्नॉलॉजी प्लॅटीन वर्ल्ड या कंपनीच्या आभासी चलनात गुंतवणूक केली. कंपनीच्या संगणकीय प्रणालीत तांत्रिक काम सुरू असल्याने महिन्याचा परतावा आभासी चलनात जमा होत होता. आभासी चलन भारतीय चलनात रुपांतरित होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे आरोपींचा काझी यांच्याशी वाद झाला होता. त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमधून काझी यांचे अपहरण केले. त्यानंतर फलटण येथील लॉजमध्ये डांबून ठेवून ६५ लाख रुपयांची मागणी केली.काझी यांना धमकावून जमिनीचे खरेदीखत करून घेतले, असे काझी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. डेक्कन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.