scorecardresearch

समाजमाध्यमातील खात्यावर पिस्तुलाचे छायाचित्र ठेवणे पडले महाग, तरुणाला अटक

मित्रांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी एकाने देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी करून समाजमाध्यमातील खात्यावर त्याचे छायाचित्र ठेवल्याचे उघडकीस आले आहे.

समाजमाध्यमातील खात्यावर पिस्तुलाचे छायाचित्र ठेवणे पडले महाग, तरुणाला अटक
प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे : मित्रांमध्ये प्रभाव पाडण्यासाठी एकाने देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी करून समाजमाध्यमातील खात्यावर त्याचे छायाचित्र ठेवल्याचे उघडकीस आले आहे. बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

तुषार पांडुरंग भालेकर (वय ३२, रा. एसटी काॅलनीजवळ, पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भालेकर याने प्रभाव पाडण्यासाठी पिस्तूल खरेदी केले होते. देशी बनावटीच्या पिस्तुलाचे छायाचित्र त्याने समाजमाध्यमातील खात्यावर ठेवले होते. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, सद्दाम शेख पर्वती दर्शन परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी भालेकरने समाजमाध्यमातील खात्यावर पिस्तुलाचे छायाचित्र ठेवले असून त्याने देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्याला पिस्तुल विक्री करणाऱ्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

हेही वाचा – पुणे: समितीची पुनर्रचना रखडल्याने दोनशेहून अधिक चित्रपट अनुदानाच्या प्रतीक्षेत

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे, अमित सुर्वे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे, किशोर वळे, अमोल दबडे आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 09:24 IST

संबंधित बातम्या