समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून युवतीवर बलात्कार करुन पसार झालेल्या आरोपीला उस्मानाबादमधून अटक करण्यात आली.संजय उर्फ ज्ञानेश्वर बाळू सितापे (वय २०, रा. चिंचोली सोनअवसा, जि. लातूर)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा- पुण्यात कोव्हिशिल्डचा तुटवडा; खासगी रुग्णालयेही खरेदीबाबत साशंक

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

तक्रारादार युवतीला सितापे याने समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविली होती. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला. युवतीला सितापेने स्वारगेट भागात भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने स्वारगेट भागातील एका लाॅजवर युवतीवर बलात्कार केला. त्याने युवतीची छायाचित्रे काढली. युवतीची छायाचित्रे त्याने समाजमाध्यमावर प्रसारित केेली तसेच युवतीच्या काकाला त्याने छायाचित्रे पाठविली.

हेही वाचा- पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी अजय मोरे यांची नियुक्ती

युवतीने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी सितापे उस्मानाबादमधील सुरडी गावात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत संदे, अश्विनी बावचे, येवले, फिराेज शेख, शिवा गायकवाड, मुकुंद तारु, भरगुडे, गायकवाड यांनी सितापेला उस्मानाबाद परिसरातून अटक केली. –