एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण ; डेक्कन चौपाटी परिसरातील घटना

पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

Crime-Fight-Pune

पुणे : एकमेकांकडे पाहण्याचा वादातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डेक्कन चौपाटी परिसरात पहाटे घडली.

आदित्य अविनाश मोरजकर (वय १८, रा. वडारवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ताऱ्या (रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत), भैय्या शिंदे (रा. मंगळवार पेठ) यांच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरजकरने या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरजकर डेक्कन चौपाटी परिसरातील उपहारगृहात पहाटे तीनच्या सुमारास गेला होता. त्या वेळी उपाहारगृहात आरोपी ताऱ्या, शिंदे आणि साथीदार तेथे आले होते. एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून आरोपींनी मोरजकरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार केला.पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youth beaten in deccan chowpatty area pune print news zws

Next Story
UGC NET 2022 EXAM : यूजीसी नेटच्या तारखा जाहीर,  जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षेचे आयोजन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी