शिरूर : मलठण रांजणगाव रोड वर मलठण येथे डंपरने दिलेल्या धडकेत मोटारसायकल वरील एक जण मृत्युमुखी पडला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. संग्राम नारायण गोपाळे वय-२४ वर्ष गुणवरे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश सुखदेव चत्तर वय. ४७ वर्ष रा. म्हसे खु ता. पारनेर जि.अहिल्यानगर यांनी डंपर क्र. एम. एच. ४५ – ए. एफ. ७८८५ मधील चालका विरोधात फिर्याद दिली आहे .
सुरेश चत्तर यांचा भाचा संग्राम नारायण गोपाळे वय.२४ वर्ष व त्याचा चुलता अतुल कचर गोपाळे दोन्ही रा. गुणवरे, ता. पारनेर ,जि.अहिल्यानगर हे पहाटे साडेपाचला रिलायन्स वेअर हाउस कंपनी शिक्रापुर येथे कामाला जाणेसाठी हिरो स्पेंल्डर कपंनीचे मोटार सायजल एम. एच.१६ -डी. एन ८०८४ वरुन मलठण ते रांजणगाव रोडवरुन मलठण येथून चालले असताना डंपर क्र. एम.एच ४५ ए.एफ ७८०५ मधील चालकाने त्याचे ताबेतील डंपर हयगयीने, रस्त्याचे नियमाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवुन मोटारसायकलला धडक दिली त्यात अतुल कचर गोपाळे रा. गुणवरे ता पारनेर जि. अहिल्यानगर हे गंभीर जखमी झाले.
तर संग्राम नारायण गोपाळे वय.२४ वर्ष रा. गुणवरे ता पारनेर जि.अहिल्यानगर हे मरण पावले. अपघातातील जखमीना कोणतीही मदत न करता तेथुन डंपर घेवुन चालक पळुन गेला. यासंदर्भात आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत.