scorecardresearch

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; राजेंद्रनगर परिसरातील घटना

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला धमकावून त्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना राजेंद्रनगर परिसरात घडली.

youth Pune kidnapped
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; राजेंद्रनगर परिसरातील घटना (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाला धमकावून त्याचे मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना राजेंद्रनगर परिसरात घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपहरण झालेला तरुण तसेच आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा – पुणे: मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे गाड्या रद्द

हेही वाचा – पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचे अपहरण; राजेंद्रनगर परिसरातील घटना

शिवलिंग दिगंबर गायकवाड (वय ३०, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) याने या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवलिंग याचा मावसभाऊ बसवंत माधव गायकवाड (वय २५) स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी तो रात्री अकराच्या सुमारास शास्त्री रस्त्यावरील अभ्यासिकेतून घरी निघाला होता. त्या वेळी सेनादत्त पोलीस चौकी परिसरात असलेल्या भिडे हाॅस्पिटलजवळ मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी बसवंतला अडवले. त्याला धमकावून मोटारीत बसवले. त्याचे अपहरण करून आरोपी पसार झाल्याचे शिवलिंग गायकवाड याने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पाेलीस निरीक्षक निकुंभ तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 09:43 IST
ताज्या बातम्या