पुणे : शाळेत झालेल्या भांडणातून युवकावर शस्त्राने वार |youth stabbed with weapon due fight in school warje pune | Loksatta

पुणे : शाळेत झालेल्या भांडणातून युवकावर शस्त्राने वार

वारजे भागातील गणपती माथा परिसरात आरोपींनी मानकर यांच्या लहान भावाला बेदम मारहाण केली.

पुणे : शाळेत झालेल्या भांडणातून युवकावर शस्त्राने वार
( संग्रहित छायचित्र )

शाळेत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून युवकाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.अविनाश सुरेश शर्मा (वय १९, रा. रामनगर, वारजे), सागर भागवत वारकरी (वय २२, रा. शिवणे), विकास सिंबन गौड (वय १८, रा. शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत निलेश मानकर (वय २८, रा. उत्तमनगर) याने वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मानकर याचा लहान भाऊ आणि आरोपींमध्ये शाळेत क्रिकेट खेळताना वाद झाला होता. वारजे भागातील गणपती माथा परिसरात आरोपींनी मानकर यांच्या लहान भावाला बेदम मारहाण केली. त्याच्यावर कोयत्याने वार केले.दहशत माजवून आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती वारजे पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपी शर्मा, वारकरी, गौड यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत काळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शिक्षण आणि क्रीडा विभाग एकाच मंत्र्याकडे असण्याची आवश्यकता ; दीपक केसरकर

संबंधित बातम्या

जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पुणे शहरातील १९ ठिकाणे ‘जीवघेणी’
पुणे: राज्यात हलका गारवा; तीन दिवसांत पुन्हा तापमानवाढीची शक्यता
पुण्याच्या कात्रजमध्ये मोटारीला वाट न दिल्याने टेम्पोचालकास बेदम मारहाण; मोटारचालक अटकेत
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची शनिवारपासून तिकीटविक्री

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…त्याला माफी म्हणता येणार नाही” नदाव लॅपिड यांच्या माफीनाम्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया
FIFA World Cup 2022: सामन्यात रेफ्रीची भूमिका सांभाळणारी, मारिया रेबेलो ठरली भारताची पहिली महिला
मुंबई: आर्थिक मागास वर्गातील १११ स्थापत्य अभियंत्यांच्या नियुक्त्यांना उच्च न्यायालयाची स्थगिती
पोलिस कोठडीत चाललेली कैद्यांची दारू-पार्टी; दोन पोलिस ताब्यात
मुंबई: राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये मल्टीपल एन्ट्री-एक्झीटचा पर्याय; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी