पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा ५९ हा आकडा सहजरित्या पार केला आहे. काँग्रेसने पंजाबच्या ११७ जागांपैकी ७७ जागांवर विजय मिळवला आहे. तर आम आदमी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. ‘आप’ला याठिकाणी २० जागा मिळाल्या आहेत.  तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला अवघ्या १८ जागा मिळाल्या आहेत. मतांच्या टक्केवारीचा विचार करता या निवडणुकीत काँग्रेसला एकूण ३८.५ टक्के मते मिळाली. तर ‘आप’ला आणि अकाली दलाला अनुक्रमे  २३.८ टक्के आणि २५.३ टक्के मते मिळाली आहेत. तर भाजपला केवळ ५.३ टक्के मिळाली आहेत.

तर दुसरीकडे निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या आम आदमी पक्षाला (आप) अपेक्षित यश मिळवता आले नाही. याठिकाणी काँग्रेस आणि आपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल, असा अंदाज होता. मात्र, काँग्रेसने सुरूवातीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. त्यामुळे आपला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या अकाली दल व भाजपला अपेक्षेप्रमाणे प्रस्थापितविरोधी लाटेचा (अँटी इन्कम्बन्सी) फटका बसला. मात्र, मतदानोत्तर चाचण्यांमधील अंदाजांप्रमाणे अकाली दल व भाजपचे पानिपत झाले नाही, हीच गोष्ट त्यांच्यादृष्टीने समाधानकारक ठरली. अकाली दल व भाजपला अनुक्रमे १४ आणि ३ जागांवर विजय मिळाला. तर लोक इन्साफ पार्टीला २ जागा मिळाल्या. मात्र, एकुणच निकाल पाहता काँग्रेसने पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले.  अकाली दलाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले असले तरी बादल कुटुंबियांचे गड असलेल्या लंबी, जलालाबाद आणि मजिठा हे तिन्ही मतदारसंघ राखण्यात अनुक्रमे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल आणि बिक्रमजित सिंग माजिठिया यांना यश आले. याशिवाय, काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पतियाळा तर नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून सहजपणे विजय प्राप्त केला. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेले यश हा काँग्रेसचा पुनर्जन्म आहे, अशी प्रतिक्रिया विजयानंतर सिद्धू यांनी व्यक्त केली. येथून पुढे काँग्रेसचा देशात पुन्हा विस्तार होईल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्याला पंजाबमधील पक्षाचा पराभव मान्य करत आम्ही या पराभवाचे आत्मपरीक्षण करु, असे सांगितले.

आतापर्यंत केवळ अकाली दल व काँग्रेसलाच आंदण असलेल्या पंजाबची निवडणूक यंदा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली होती. ११७ आमदारांचे संख्याबळ असलेल्या पंजाब विधानसभेत गेल्यावर्षी ५६ जागा जिंकत शिरोमणी अकाली दल राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. ४६ जागा मिळवणारा काँग्रेस पक्षाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी काँग्रेसच्या मिळालेल्या एकुण मतांची टक्केवारी ( ३९.९२) ही अकाली दलाच्या (३४.५९) मतांपेक्षा जास्त होती. तर याठिकाणी नेहमी अकाली दलाच्या लहान भावाच्या भूमिकेत राहिलेल्या भाजपला फक्त १२ जागांवर यश मिळाले होते.

 

२०१२ मधील मतदारसंघनिहाय विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे

सुजानपूर- दिनेश सिंग (भाजप)
भोआ- सीमा कुमारी (भाजप)
पठाणकोट- अश्वानी कुमार शर्मा (भाजप)
गुरूदासपूर- गुरूबचन सिंग बबेहाली (अकाली दल)
दिना नगर- अरूणा चौधरी (काँग्रेस)
कादियान- चरणजीत कौर बाजवा (काँग्रेस)
बाटला- अश्वानी शेखरी ( काँग्रेस)
श्री हरगोविंदपूर- देस राज धुग्गा (अकाली दल)
फतेगढ चुरियन- तिरपट राजेंदर सिंग बाजवा (काँग्रेस)
डेरा बाबा नानक- सुखजिंदर सिंग (काँग्रेस)
अंजाला- बॉनी अमरपाल सिंग अंजाला (अकाली दल)
राजा सांसी- सुखबिंदर सिंग सरकारिया (काँग्रेस)
माजिठिया- बिक्रमसिंग माजिठिया (अकाली दल)
जंदियाला- बलजित सिंग जलाल उस्मा (अकाली दल)
अमृतसर उत्तर- अनिल जोशी (भाजप)
अमृतसर पश्चिम- राज कुमार (काँग्रेस)
अमृतसर मध्य- ओमप्रकाश सोनी (काँग्रेस)
अमृतसर पूर्व- नवज्योत सिद्धू (भाजप)
अमृतसर दक्षिण- इंद्रबिर सिंग बोलारिया ( अकाली दल)
अटारी- गुलझार सिंग रानीके (अकाली दल)
तरन तारन- हरमित सिंग संधू (अकाली दल)
खेम करन- विरसा सिंग (अकाली दल)
पट्टी- आदेशप्रताप सिंग कैरो (अकाली दल)
खादूर साहिब- रमणजीत सिंग सिक्की (काँग्रेस)
बाबा बकाला- मनजित सिंग मन्ना मियाविद (अकाली दल)
भोलाथ- बीबी जागीर कौर (अकाली दल)
कपुरथळा- राणा गुरजीत सिंग (काँग्रेस)
सुलतानपूर लोधी- नवतेज सिंग (काँग्रेस)
फगवारा- सोम प्रकाश (भाजप)
फिल्लूर- अविनाश चंदर ( भाजप)
नाकोदर- गुरूप्रताप सिंग वडाला (अकाली दल)
शानकोट- अजित सिंग कोहर (अकाली दल)
कर्तापूर- सरवन सिंग (अकाली दल)
जालंदर पश्चिम- चुनी लाल भगत (भाजप)
जालंदर मध्य- मनोरंजन कैला (भाजप)
जालंदर उत्तर- के.डी. भंडारी (भाजप)
जालंदर कॅन्टोनमेंट- परगत सिंग (अकाली दल)
अदमपूर- पवान कुमार टिनू (अकाली दल)
मुक्रियन- रजनिश कुमार (अपक्ष)
दसुया- अमरजित सिंग (भाजप)
उरमर- संगत सिंग (काँग्रेस)
शाम चौरासी- मोहिंदर कौर जोश (अकाली दल)
होशियारपूर- सुंदर शाम अरोरा (काँग्रेस)
छाबेवाल- सोहन सिंग थंडल (अकाली दल)
ग्रहशंकर- सुरिंदर सिंग भुलेवाल रथन (अकाली दल)
बंगा- तारलोचन सिंग (काँग्रेस)
नवान शहर- गुरीक्बाल कौर ( काँग्रेस)
बलाचौर- नंद लाल (अकाली दल)
आनंदपूर साहिब- मदन मोहन मित्तल (भाजप)
रूपननगर- दलजित सिंग चीमा (अकाली दल)
चमकौर साहिब- चरणजित सिंग चैनी (काँग्रेस)
खरर- जगमोहन सिंग ( काँग्रेस)
एस.ए.एस. नगर- बलबीर सिंग सिधू (काँग्रेस)
बस्सी पठाना- निर्मल सिंग (अकाली दल)
फतेगढ साहिब- कुलजित सिंग नगरा (काँग्रेस)
आमलोह- रणदीप सिंग (काँग्रेस)
खन्ना- गुरकिरट सिंग (काँग्रेस)
समराला- अमरिक सिंग (काँग्रेस)
साहेनवाल- शरणजित सिंग धिल्लो (अकाली दल)
लुधियाना पूर्व- रणजित सिंग धिल्लो (अकाली दल)
लुधियाना दक्षिण- बलविंदर सिंग बैन्स (अपक्ष)
अताम नगर- सिमरजित सिंग बैन्स (अपक्ष)
लुधियाना मध्य- सुरिंदर कुमार दावर (काँग्रेस)
लुधियाना पश्चिम- भारत भुषण आशू (काँग्रेस)
लुधियाना उत्तर- राकेश पांडे ( काँग्रेस)
गिल- दर्शन सिंग शिवालिक (अकाली दल)
पायल- चरणजित सिंग अटवाल (अकाली दल)
डाखा-  मनप्रित सिंग अयाली (अकाली दल)
रायकोट- गुरूचरण सिंग (काँग्रेस)
जाग्रोन- एस. आर. कालेर (अकाली दल)
निहाल सिंग वाला- राजविंदर कौर ( अकाली दल)
भागा पुराना- महेशिंदर सिंग (अकाली दल)
मोगा- जोगिंदर पाल जैन (काँग्रेस)
धरमकोट- तोता सिंग (अकाली दल)
झिरा- हरी सिंग (अकाली दल)
फिरोझपूर सिटी- परमिंदर सिंग पिंकी (काँग्रेस)
फिरोझपूर ग्रामीण- जोगिंदर सिंग (अकाली दल)
गुरू हर साहई- गुरमीत सिंग सोधी ( काँग्रेस)
जलालबाद- सुखबिर सिंग बादल (अकाली दल)
फझिल्का- सुरजित कुमार जानी (भाजप)
अबोहार- सुनिल कुमार जखार (काँग्रेस)
बलुआना- गुरतेज सिंग (अकाली दल)
लंबी- प्रकाश सिंग बादल (अकाली दल)
गिडरबाहा- अमरिंदर सिंग राजा वारिंग (काँग्रेस)
मालआऊट- हरप्रीत सिंग ( अकाली दल)
मुक्तसर- करण कौर (काँग्रेस)
फरीदकोट- दीप मल्होत्रा (अकाली दल)
कोटकपुरा- मंतर सिंग ब्रार (अकाली दल)
जैतू- जोगिंदर सिंग (काँग्रेस)
रामपुरा फुल- सिकंदर सिंग मलुका (अकाली दल)
भुचो मंडी- अजायब सिंग भट्टी ( काँग्रेस)
भटिंडा शहर- सरूप चंद सिंगाला ( अकाली दल)
भटिंडा ग्रामीण- दर्शन सिंग कोटफट्टा (अकाली दल)
तालवंदी साबो- जितमोहिंदर सिंग संधू (काँग्रेस)
मौर- जनमेजा सिंग (अकाली दल)
मानसा- प्रेम मित्तल (अकाली दल)
शार्दुलगड- अजित इंदर सिंग (काँग्रेस)
बुधलादा- चाटियन सिंग (अकाली दल)
लेहरा- राजिंदर कौर भट्टल (काँग्रेस)
दिरबा – संत बलवीर सिंग घुनास (अकाली दल)
सुनाम – परमिंदर सिंग धिंडसा (अकाली दल)
बहादूर – मोहम्मद सादिक (काँग्रेस)
बर्नाला – केवल सिंग धिलाँ (काँग्रेस)
मेहल कलान – हरचंद कौर (काँग्रेस)
मालेरकोटला – एफ. नेसारा खातून (अकाली दल)
अमरगढ – इक्बाल सिंग झुंदान (अकाली दल)
धुरी – अरविंद खन्ना (काँग्रेस)
संग्रूर – प्रकाशचंद गर्ग (अकाली दल)
साधू सिंग – नभा (काँग्रेस)
पतियाळा ग्रामीण – ब्रह्म मोहिंद्र (काँग्रेस)
राजपुरा – हरदयाळ सिंग कामबोज (काँग्रेस)
देरा बस्सी – एन. के शर्मा (अकाली दल)
घनौर – हरप्रीत कौर (अकाली दल)
सनौर – लाल सिंग (काँग्रेस)
पतियाळा – अमरिंदर सिंग (काँग्रेस)
सामना – सुरजित सिंग राख्रा (अकाली दल)
शुत्राना – विरेंद्र कौर लूंबा (अकाली दल)

एक्झिट पोल्सचे निकाल काय आहेत?

इंडिया टुडे-अॅक्सिसच्या अंदाजानुसार काँग्रेस पंजाबमध्ये ६२-७१ जागा जिंकून सहजपणे सत्ता मिळवेल. या सर्वेक्षणानुसार ढोबळ समीकरणे लक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेल्या काँग्रेसला ३६ टक्के मते मिळाली आहे. तर आप पंजाबमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल. त्यांना याठिकाणी ४२ ते ५१ जागा मिळण्याचा अंदाज असून आपला एकूण ३३.५ टक्के मते मिळतील. तर अकाली दल आणि भाजप सर्वात तळाला फेकला गेला असून त्यांना केवळ ४-७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार आम आदमी पक्ष पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरणार असून त्यांना ५९ ते ६७ जागा मिळतील. तर काँग्रेसला ४१-४९ जागा मिळतील. गेल्यावर्षीही पंजाबमध्ये काँग्रेसला ४६ जागाच मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदाही काँग्रेसची परिस्थिती तशीच राहण्याचा सी-व्होटरचा अंदाज आहे.

टुडेज चाणक्यने पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळेल. या दोन्ही पक्षांना ५४ जागा मिळणार असून त्यामध्ये ९ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. तर अकाली दल आणि भाजपला ९ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

पंजाब (११७ जागा)
इंडिया टुडे | काँग्रेस (६२-७१), भाजप + अकाली दल (४-७), आप (४२-५१), अपक्ष (०-२)
अॅक्सिस माय इंडिया | भाजप + अकाली दल ( ७), आप (४२-५१), काँग्रेस (६२-७१), अपक्ष (२)
सी व्होटर | भाजप + अकाली दल (१३), आप (५९-६७), काँग्रेस (४१-४९), अपक्ष (३)