News Flash

‘शीख समुदायाचा संहार करणाऱ्या पक्षात सिद्धूंची घरवापसी’

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी काँग्रेसवासी झालेले नवज्योतसिंग सिद्धू व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी काँग्रेसवासी झालेले नवज्योतसिंग सिद्धू व काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शीख समुदायाचा संहार करणाऱ्या पक्षात ‘घरवापसी’ झाल्याबद्दल सिद्धूंचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला आहे. तसेच राहुल गांधी हेच स्वत: नशा करत असतील त्यामुळे त्यांना पंजाबमधील ७० टक्के लोक नशेखोर दिसतात असा गंभीर आरोप त्यांनी केला.

या वेळी हरसिमतर कौर यांनी सिद्धू यांच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. त्या म्हणाल्या, काही लोक तीन-तीन डगरीवर पाय ठेवून असतात. कधी भाजप, काँग्रेस तर पाकिस्तानातही जाण्यासही ते कचरणार नाहीत. ज्या शीख समुदायाचा नरसंहार काँग्रेस पक्षाने केला. त्या पक्षात सिद्धू गेले आहेत. त्यांच्या घरवापसीला माझ्या शुभेच्छा आहेत, असे त्या म्हणाल्या.
राहुल गांधी हे आपल्या सभेत वारंवार पंजाबमधील ड्रग्ज माफियांबद्दल व राज्यात नशेखोरांचे प्रमाण वाढल्याचे सांगतात. त्याचाही उल्लेखही त्यानी पत्रकारांशी बोलताना केला. तत्पूर्वी प्रकाशसिंग बादल आणि विक्रमसिंग मजेठिया यांनीही सिद्धूवर टीकेची झोड उठवली होती.
दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू व शिरोमणी अकाली दलातील वैरत्व सर्वांनाच माहित आहे. आज (सोमवार) दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नवज्योतसिंग सिद्धू यांनी शिरोमणी अकाली दल व भाजपवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यास अकाली दलाने आघाडी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2017 2:31 pm

Web Title: harsimrat kaur badal criticizes on rahul gandhi and navjot singh sidhu
Next Stories
1 हे तर दल बदलू, सौदे करणारे; प्रकाशसिंग बादलांचा नवज्योतसिंग सिद्धूवर पलटवार
2 भाजपला कैकेयीची उपमा देत नवज्योतसिंग सिध्दू म्हणाले, काँग्रेस प्रवेश म्हणजे माझी घरवापसीच
3 नवज्योत सिंग सिध्दू काँग्रेसच्या गोटात
Just Now!
X