News Flash

शिक्षणाची आच

आपल्यावर आज ही वेळ आली नसती असा विचार अनेकदा मनात यायचा.

रेल्वे मजूर अर्थात रेल्वेत चतुर्थश्रेणी कामगार असलेल्यांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून कायम धाक-धपटशा आणि अपमानास्पद वागणूक मिळायची. आपण निरक्षर आहोत याचे त्यांना सतत दु:ख व्हायचे. आपण शिकलो असतो तर आपल्यावर आज ही वेळ आली नसती असा विचार अनेकदा मनात यायचा. आपण शिकलो नाही तर निदान आपल्या मुलांनी तरी शिकले पाहिजे म्हणजे त्यांचे आयुष्य सुखावह होईल या इच्छेपोटी मुलाला शाळेत घातले जाते. परंतु काही कारणाने सलग शाळेत गैरहजेरी लागल्यामुळे त्यांचे नाव शाळेतून कमी करण्याचा आदेश दिला जातो.
स्वत: लेखक जेव्हा एका शाळेत शिक्षकाची नोकरी करत असतात तेव्हा त्यांच्यावर एका वर्गाची जबाबदारी सोपावली जाते. त्यात हजेरी नोंदवहीत गैरहजर असणाऱ्या मुलांच्या नावासमोर मुख्याधापक त्यांना ‘सतत गैरहजर..सबब नाव कमी’ असा शेरा लिहायला सांगतात. असे केल्याने ही मुले कायमची शिक्षणापासून वंचित राहतील या गोष्टीचे वाईट वाटून त्यांना स्वत:च्या लहानपणीचा शाळेतील प्रसंग आठवतो. ज्या भोवती या पुस्तकातील आत्मकथन गुंफले आहे.

सतत गैरहजर सबब नाव कमी
    लेखक : धोंडुजा इंगोले
    प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ    
    पृष्ठ : २४०      मूल्य : २५०/ रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 1:10 am

Web Title: author dhonduja ingole book review
Next Stories
1 माहितीचा खजिना
2 प्रवासभान देणारी साद
3 मिरासदारांची हसवा-हसवी
Just Now!
X