News Flash

कवितांचे रसाळ रसग्रहण

शालेय जीवनात विंदा कोल्हापुरला असताना वार लावून जेवत असत.

‘वाड;मयीन निर्मिती कलावंताच्या स्वतंत्र प्रतिभेचा अत्युच्च आविष्कार असते. इथे कुठल्याही प्रकारची बांधिलकी नसते किंवा मागणीबरहुकूम केलेली कारागिरी नसते. काव्यातील भावसत्य म्हणजे केवळ वास्तवाचा तपशील नव्हे किंवा गवसलेले शास्त्रसिद्ध जीवनार्थ नव्हे. ते कवीच्या विशिष्ट भावसधन अशा मनाच्या अवस्थेत जाणवलेले, अभिव्यक्तीला आतुर झालेले भावसत्य आहे, जे दुसऱ्या कुणालाही उचलून वापरता येण्यासारखे नाही’.

लेखिका ‘सुपर्णा कुलकर्णी’ यांनी ‘काही ओळी अनुभवाव्या’ या लेखसंग्रहाच्या मनोगतात नमूद केलेले वाड;मयीन कलाकृतींबद्दलचं त्यांचं मत त्यांच्या लिखाणातून प्रतििबबित होत राहते. एका दैनिकाच्या मुंबई आवृत्तीसाठी त्यांनी ‘एक तरी ओवी अनुभवावी’ च्या धर्तीवर ‘काही ओळी अनुभवाव्या’ या शीर्षकाखाली सदर लेखन केले. या सदराच्या निमित्ताने त्यांनी लिहिलेल्या ५१ लेखांचा हा संग्रह. बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, अरुणा ढेरे, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, गोिवदाग्रज, कवी बी, केशवकुमार(आचार्य अत्रे), बा.सी मर्ढेकर, दया पवार, शांती शेळके, बा.भ. बोरकर, वसंत बापट, िवदा करंदीकर, सुरेश भट, ग. दि. माडगूळकर, पु. शि. रेगे, ना. घ. देशपांडे, निरंजन उजगरे, र. कृ. जोशी, वसंत आबाजी डहाके, शिरीष प अशा दिग्गज कवी-कवयित्रींच्या सुपरिचित कविता, त्यांचे रसग्रहण असे या संग्रहाचे स्वरूप आहे. किंबहुना कवितांच्या रसग्रहणापेक्षा त्या त्या कवितेच्या अनुषंगाने सुचलेले विचार मांडले आहेत. त्या कवितेतील शाश्वत मूल्यांची आजच्या जीवनाशी सांगड घातली आहे. प्रसंगी ऐतिहासिक, पौराणिक, वास्तव जीवनातले दाखले दिले आहेत. त्यामुळेच कवितेचा केवळ भावार्थ शोधत, कवीला नेमके काय म्हणायचे आहे याविषयी स्वत:चे मत न मांडता, त्या कवितेतून त्यांना काय गवसले याविषयी सुपर्णा कुलकर्णी यांनी लिहिले आहे. कवितेच्या अनुषंगाने इतर संदर्भ देताना अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. प्रत्येक कवितेच्या रचनेचा कालखंड लक्षात घेऊन तत्कालीन घटना, समाजव्यवस्था याचेही संदर्भ दिले आहेत.

श्री. बा. रानडे यांच्या ‘माधुकरी’ कवितेविषयी लिहिताना कवी िवदा करंदीकर यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला आहे. शालेय जीवनात िवदा कोल्हापुरला असताना वार लावून जेवत असत. कोल्हापूरच्या अन्नपूर्णा खानावळीत त्या काळातले अनेक दिग्गज जेवायला जात असत. एक दिवस िवदा त्या खानावळीत वारावर जेवायला गेले असता, पंडित जगन्नाथबुवा तिथे जेवायला आले होते. त्यांच्या पानात पोळी वाढली गेली आणि िवदा वारावर जेवत असल्यामुळे त्यांना भाकरी वाढली. ते बघून आपल्या पानातली पोळी जगन्नाथबुवांनी िवदांना वाढली.

इंदिरा संतांच्या ‘पत्र लिही पण..’ या कवितेविषयी लिहिताना ‘पत्र’ हा साहित्यकृतींचाच एक भाग कसा आहे यावर दृष्टिक्षेप टाकला आहे. त्या निमित्ताने पु. शि. रेगे यांची ‘सावित्री’ कादंबरी, गौरी देशपांडेंची ‘तेरुओ’ कादंबरी, तसेच ‘स्त्रियांची शतपत्रे’ अशा साहित्यकृतींचे संदर्भ दिले आहेत. इंदिरा संतांच्याच ‘लास्य रंगता कैलासावर’ या कवितेबद्दल लिहिताना भरतनाटय़म्, कथकली, ओडिसी या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांच्या उगमाबद्दल सांगितले आहे.

लेखांच्या सुरुवातीला काही कविता संपूर्ण दिल्या आहेत, तर काही कविता दीर्घ असल्याने त्यांचा विशिष्ट भागच समाविष्ट केला आहे. हे लेख कवितेच्या अनुषंगाने लिहिलेले असले तरी प्रत्येक लेखाला कवितेचेच नाव देणे टाळले आहे. कवितेचा भावार्थ आणि लेखात मांडलेले विचार यांचा मेळ साधेल असे शीर्षक प्रत्येक लेखाला दिले आहे. कविता आणि कवितेबद्दलच न लिहिता कवितेच्या किंवा त्यातल्या काही ओळींच्या अनुषंगाने वास्तविक, सामाजिक, ऐतिहासिक संदर्भ देत लेख लिहिले आहेत. कदाचित काही वाचकांना तो फापटपसारा वाटू शकतो, कवितेच्या भावार्थाव्यतिरिक्त अनावश्यक लिखाण वाटू शकते, परंतु ते भरकटलेले नाही.

काव्याबद्दल लिहायचे म्हणून कुठेही अवाजवी अलंकारिक, क्लिष्ट भाषा वापरलेली नाही. सामान्य वाचकाला उमजेल असे लेखन केले आहे. असे लेखन करताना कुठेही समीक्षेकडे न झुकता लिहिलेले असले तरी ते निव्वळ रसग्रहणही नाही. कवितांच्या निमित्ताने केलेले ललित लेखन असे या संग्रहाला म्हणता येईल.

काही ओळी अनुभवाव्या, सुपर्णा कुलकर्णी, प्रकाशक : परममित्र प्रकाशन पाने : २००, किंमत : रु. २००/-
दुहिता सोमण – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:10 am

Web Title: marathi book review kahi oli anubhavavya
Next Stories
1 विज्ञानकथांची रोमांचक सफर
2 अस्वस्थ काळाचे दर्शन
3 घडलेल्या, घडवलेल्या माणसांची गोष्ट
Just Now!
X