03 March 2021

News Flash

सॅलड सदाबहार : सफरचंद आणि खसखस सॅलड

सफरचंद थोडय़ाशा गरम पाण्यात बुडवून स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे छान काप करा.

(संग्रहित छायाचित्र)

शेफ नीलेश लिमये

साहित्य

*   २ हिरवी सफरचंद, २ चमचे लिंबाचा रस, २ मोठे चमचे चक्का, १ मोठा चमचा मध किंवा काकवी, १०-१२ पालकाची कोवळी पाने, १ चमचा भाजलेली खसखस, अक्रोड/स्ट्रॉबेरी/चेरीज आवडत असतील तर.

कृती :

सफरचंद थोडय़ाशा गरम पाण्यात बुडवून स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे छान काप करा. त्यावर लिंबाचा रस ओतून फ्रीजमध्ये १०-१५ मिनिटे ठेवा. पालकाची कोवळी पाने धुऊन घ्या. स्ट्रॉबेरी स्वच्छ धुऊन, पुसून त्याच्या फोडी करा. आता दुसऱ्या एका बाऊलमध्ये चक्का आणि मध किंवा काकवी एकत्र करून घ्या.

ज्या बाऊलमध्ये सॅलड देणार आहात, त्यात सफरचंदाच्या फोडी, पालकाची पानं, स्ट्रॉबेरी, अक्रोड एकत्र करा. यावर दह्य़ाचं ड्रेसिंग घाला. वरून भाजलेली खसखस पेरा आणि हे आगळंवेगळं सॅलड खायला तयार आहे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 3:02 am

Web Title: apple and poppy salad recipe
Next Stories
1 सदाबहार पॅरिस
2 दोन दिवस भटकंतीचे : सासवड
3 खाद्यवारसा : बोंबील फ्राय
Just Now!
X