शुभा प्रभू साटम

डब्याला देण्यासाठी हा एक चविष्ट आणि पौष्टिक खाद्यपदार्थ. या उपम्यामध्ये तुम्हाला डाळी आणि भाज्याही घालता येतील.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…
How To Make Home Made Raw Banana Fry Or Maharastrian Style Kachya Kelyache Kaap Note Recipe
१० मिनिटांत करा ‘कच्च्या केळ्यांचे तिखट काप’; ‘ही’ चटपटीत रेसिपी लगेच नोट करा…

साहित्य :

१ वाटी दलिया, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पाव वाटी (गाजर + मटार + फ्लॉवर +  सिमला मिरची + फरसबी बारीक चिरून) मूगडाळ पाव वाटी, चवीनुसार मीठ, साखर.

फोडणीसाठी – तूप, मोहोरी, हिंग, हळद , कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आले, लाल मिरच्या.

कृती :

कोरडा दलिया लालसर होईस्तोवर भाजून घ्यावा. तुपाच्या फोडणीत मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता हिरव्या मिरच्या, आले घालावे. ही फोडणी छान बसल्यावर त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्यावा. मग भाज्या परताव्या. त्या थोडय़ा शिजल्यानंतर डाळ घालून हळद घालावी आणि परतावे. सर्वात शेवटी दलिया घालावा. दलियाच्या दोन ते अडीच पट गरम पाणी घालावे. मीठ, साखर घालून मंद आचेवर शिजवावे. हा शिरा अगदी गोळाही होणार नाही आणि अगदी कोरडाही होणार नाही, अशा प्रकारे वाफेवर शिजवून घ्यावा.