ज्योती चौधरी-मलिक
साहित्य
दोन वाटय़ा कणिक, थोडे डाळीचे पीठ, एक वाटी गूळ, अर्धी वाटी तूप आणि वेलची पूड, चवीपुरते मीठ.
कृती
कणकेमध्ये थोडे डाळीचे पीठ मिसळावे. त्यात चवीसाठी इवलेसे मीठ घालावे. यानंतर गुळाचे घट्ट पाणी तयार करावे. कणकेच्या निम्म्याने गूळ घ्यावा.
कणकेमध्ये गरम तुपाचे मोहन घालावे आणि तूप कणकेला चांगलेच चोळावे. नंतर गुळाच्या पाण्याने कणीक घट्ट भिजवून ठेवावी. अंदाजे अध्र्या तासानंतर गोळे तयार करावेत. ते जाडसर लाटावेत आणि तव्यावर छान शेकावेत. नंतर नेहमीप्रमाणे कातणीने शंकरपाळे कापावे व कढईत तूप गरम करून तुपात मंदाग्नीवर तळावे. मंद आचेवर सावकाश तळल्याने शंकरपाळे खुसखशीत होतात.
पाककृतीसाठी लागणारा वेळ :
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1
एकूण वेळ : 1
पदार्थाचा प्रकार :
किती व्यक्तींसाठी :
लेखक : Array
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 13, 2018 4:22 am