X

खाद्यवारसा : बांबूची भाजी

पॅनमध्ये तेल तापवून घ्या. त्यावर वाटलेले आले, लसूण आणि कांदा घालून गुलाबी परतून घ्या

ज्योती चौधरी-मलिक

साहित्य :

२ वाटय़ा कोवळा बांबू साफ करून चिरलेला, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १वाटी बारीक चिरलेला कांदा, १ वाटी ओला नारळ किसून, २ चमचे आले-लसूण वाटलेले, २ पळ्या तेल, २ चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर, १ चमचा धनेजिरे पूड, १ चमचा गरम मसाला पावडर, २/३ आमसुले, मीठ चवीप्रमाणे.

कृती :

पॅनमध्ये तेल तापवून घ्या. त्यावर वाटलेले आले, लसूण आणि कांदा घालून गुलाबी परतून घ्या. नंतर टोमॅटो घाला व परता. सगळे कोरडे मसाले घालून परतून घ्या. त्यावर ओला नारळ आणि बांबूचे काप घालून परतून घ्या. मीठ घाला, दीड कप पाणी घाला. झाकण ठेवून शिजवून घ्या. शिजत आल्यावर आमसुले घाला व ५ मिनिटे शिजू द्या. एक वेगळी आणि पौष्टिक भाजी तयार. ज्यांना मांसाहार आवडत असेल त्यांनी बांबूसोबत कोलंबी घालून बनवावी.