ज्योती चौधरी-मलिक

साहित्य : २ बटाटे, १ कांदा, आलं-लसूण ठेचलेलं, २ चमचे तेल, १ चमचा हळद, १ चमचा भंडारी मसाला, मीठ

कृती : प्रथम बटाटय़ाच्या गोल चकत्या करा. त्या जाडसरच असतील याची काळजी घ्या. कांदा बारीक चिरून घ्या. आलं-लसूण ठेचून घ्या. एक पातेले घ्या. त्यात सर्व मसाला एकत्र करून कुस्करून घ्या. वरून तेल घाला. सर्वात शेवटी बटाटय़ाच्या चकत्या घाला. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा. झाकणावर पाणी ठेवून हे शिजवा.