24 May 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : बंगाली मस्टर्ड प्रॉन्झ करी

थोडा लालसर रंग आल्यावर त्यात खोबऱ्याचे वाटण आणि झिंगे घालावेत.

बंगाली मस्टर्ड प्रॉन्झ करी

दीपा पाटील

साहित्य

८ झिंगे, २ कप खोवलेले खोबरे, २ हिरव्या मिरच्या, १ बारीक चिरलेला कांदा, २ चमचे वाटलेली मोहरी, अर्धा चमचा वाटलेले आले, २ चमचे मोहरीचे तेल, अर्धा चमचा जिरे, २ तमालपत्र, २ वेलच्या, ४ लवंगा, १ चमचा साखर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, १ चमचा धनेपूड, मीठ.

कृती –

आधी झिंग्यांना मीठ आणि हळद लावून अर्धा तास मुरत ठेवावे. खोवलेले खोबरे, वाटलेली मोहरी, धनेपूड, तिखट एकत्र करून बारीक वाटून घ्यावे. पातेल्यात मोहरीचे तेल गरम करून त्यात मुरवलेले झिंगे मस्त परतून घ्यावेत. हे झिंगे दुसऱ्या भांडय़ात काढून त्याच पातेल्यात पुन्हा थोडे तेल गरम करावे आणि हिरवी मिरची, जिरे, तमालपत्र व वेलची परतावी. या मसाल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि वाटलेले आले-लसूण परतावे. थोडा लालसर रंग आल्यावर त्यात खोबऱ्याचे वाटण आणि झिंगे घालावेत. थोडे पाणी आणि मीठ घालावे. दणदणीत वाफ आणून मग पातेले आचेवरून खाली उतरवावे. भातासोबत हा बंगाली रस्सा खावा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2019 3:11 am

Web Title: bengali mustard prawn curry recipe zws 70
Next Stories
1 कुटुंबनियोजनाच्या सुरक्षित पद्धती
2 आजारांचे कुतूहल : पोटदुखी अपेंडिक्सची
3 घरचा आयुर्वेद : अजीर्ण
Just Now!
X