19 September 2020

News Flash

सॅलड सदाबहार : ब्रोकोली  अ‍ॅपल सॅलड

सगळ्यात आधी ब्रोकोलीचे तुरे निवडून, चिरून घ्या. तुरे अगदी बारीक करू नका. आता स्वच्छ पाण्यात छान धुऊन घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

शेफ नीलेश लिमये

दिवाळी जवळ येऊ लागली आहे तशी हळू हळू थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे आता सॅलडसाठी मस्त ताज्या भाज्या मिळणार आणि त्यांची झक्कास सॅलड कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार. तेव्हा ही सॅलड नक्की करून पाहा आणि मला तुमच्या प्रतिक्रियाही जरूर कळवा.  ब्रोकोली आता सगळीकडे साधारण मिळतेच. ती नाही मिळाली तर मग त्याची पाने नाहीतर फुले वापरू शकता. सुका मेवा आवडत असल्यास आणखी घातला तरी चालेल. आवडीनुसार जर्दाळू, अंजीर, कोकम कँडी, मँगो कँडी, भोपळ्याच्या बिया, जवसाच्या बिया याचाही वापर करता येईल. मी केलेल्या ड्रेसिंगला पर्याय म्हणून तुम्ही पंचामृतही वापरू शकता.

साहित्य

*  पाव किलो ब्रोकोली, १ सफरचंद, ३-४ अक्रोड, १ गाजर, ५-६ मनुका

ड्रेसिंगसाठी – १०० ग्रॅम दही, पुदिन्याची पाने, मीठ, मिरपूड, १ चमचा मेयोनिझ

कृती :

सगळ्यात आधी ब्रोकोलीचे तुरे निवडून, चिरून घ्या. तुरे अगदी बारीक करू नका. आता स्वच्छ पाण्यात छान धुऊन घ्या. उकळत्या पाण्यात हे तुरे २-३ मिनिटे ब्लांच करून घ्या. लगेच थंड करा. गाजर किसून घ्या. तेही त्याच पाण्यातून २-३ मिनिटे ब्लांच करून घ्या. लगेच थंड करा. आता मनुका साध्या पाण्यात भिजवत ठेवा. सफरचंदाच्या बारीक फोडी करून त्यावर लिंबू पिळून ठेवा. या सगळ्या गोष्टी थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. ड्रेसिंगसाठी दही आणि मेयो फेटून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, मिरपूड घाला. यानंतर एका पसरट भांडय़ात ब्रोकोली आणि सफरचंद एकत्र करा. त्यात गाजर, मनुका घाला. आता यावर ड्रेसिंग घाला आणि अक्रोडनी हे सॅलड सजवा. हे सॅलड दुपारच्या जेवणात अवश्य घ्या, यामुळे  तुमचा आळस कसा पळून जातो, ते पाहा!

nilesh@chefneel.com

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:43 am

Web Title: broccoli apples salad recipe
Next Stories
1 नेत्रसुखद वास्तुशिल्पं
2 अलिबाग
3 मेथी पुरी
Just Now!
X