X

सकस सूप : ब्रोकोली सेलेरी सूप

पातेल्यात पाणी उकळून त्यात ब्रोकोली आणि सेलेरी उकळून घ्या. यातच मीठ आणि काळी मिरीही उकळा.

ब्रोकोली सेलेरी सूप

साहित्य

* अर्धा किलो ब्रोकोली

* सेलेरीच्या ४-५ काडय़ा

*  १ मोठा कांदा

*  ३० ग्रॅम बटर

*  २ चमचे मीठ

*  १ चमचा काळी मिरी, पाऊण कप पाणी

कृती

* ब्रोकोली आणि सेलेरी धुऊन चिरून घ्या.

* पातेल्यात पाणी उकळून त्यात ब्रोकोली आणि सेलेरी उकळून घ्या. यातच मीठ आणि काळी मिरीही उकळा.

*  एका पसरट पातेल्यामध्ये बटर वितळवून घ्या. कांदा बारीक चिरा आणि ३-४ मिनिटे या बटरमध्ये परता.

*  आता बटरवर ब्रोकोली आणि सेलेरीचे मिश्रण ओता. नीट मिसळून शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून ते वाटून घ्या.

*  पुन्हा एकदा पातेल्यात घालून गरम करून प्या किंवा थंडच सव्‍‌र्ह करा.