शुभा प्रभू-साटम

साहित्य

रवा, मीठ, मिरपूड, पाणी, चीझ, ब्रेडचा चुरा, तेल, चिली फ्लेक्स आणि हब्र्ज

कृती

दोन कप पाणी उकळत ठेवून त्यात ड्राय हब्र्ज, चिली फ्लेक्स, मीठ, मिरपूड घालावी. या पाण्याला उकळी आली की एक कप बारीक रवा त्यात घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे. हे साधारण उपम्यासारखे दिसायला हवे. हे मिश्रण गार करत ठेवावे. चीझचे दोन क्यूब किसून घ्यावेत. गार झालेल्या रव्याच्या मिश्रणात हे चीझ घालावे. हे मिश्रण नीट मळून घ्यावे. ते एकत्र होत नाही असे आढळल्यास उकडलेला बटाटा किसून घालावा. चवीप्रमाणे हब्र्ज आणि मीठही वाढवावे. आता याचे चपटे गोळे करून फ्रिजमध्ये दहा मिनिटे ठेवावे. त्यावर झाकण ठेवू नये. यानंतर ब्रेडच्या चुऱ्यात ते घोळवून तव्यावर परतून घ्यावेत.