14 October 2019

News Flash

परदेशी पक्वान्न : चिकन बर्गर

एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे.

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश लिमये

साहित्य

चिकन खिमा २५० ग्रॅम, कांदे बारीक चिरून २, तळलेला कांदा २ टेबलस्पून, कोिथबीर बारीक चिरून २ टेबलस्पून, लसूण पेस्ट १ टीस्पून, चिली फ्लेक्स  ३ टेबलस्पून, काळी मिरची पूड ३ टेबलस्पून, अंडे १, ब्रेडक्रम ३ टेबलस्पून, बर्गर बन्स  ४, मेयोनिझ अंदाजे,  सलाडची पानं, मीठ चवीनुसार

कृती :

एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे त्यात कांदा घालून चांगले परतून घ्यावे. दुसरीकडे एका बाउलमध्ये चिकन खिमा घेऊन त्यात कोथिंबीर, मीठ, चिली फ्लेक्स, काळी मिरची पावडर, लसूण पेस्ट आणि तळलेला कांदा घालावा त्यातच एक अंडे घालून मिश्रण छान मिक्स करून घ्यावे. मिश्रण छान एकजीव झाले की त्याचे गोळे करून थोडय़ा तेलात फ्राय करून घ्यावे. दोन बन्स घेऊन त्यावर सलाडची पानं ठेवावीत. त्यावर मेयोनिज लाऊन घ्यावे. त्यावर चिकन टिक्की ठेऊन त्यावर दुसरा बन्स ठेवावा. अशा प्रकारे आपला चिकन बर्गर तयार आहे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on May 16, 2019 12:22 am

Web Title: chicken burger recipe