22 April 2019

News Flash

स्वादिष्ट सामिष : चिकन पायनॅपल कबाब

टोमॅटो, भोपळी मिरच्या व्यवस्थित चौकोनी चिरून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

दीपा पाटील

साहित्य

अननसाचे काही तुकडे आणि थोडासा अननसाचा रस, चिकनचे तुकडे, १ चमचा धने-जिरेपूड, १ चमचा लसूण पेस्ट, २ चमचे दही, २ रंगीत भोपळी मिरची, १० चेरी टोमॅटो, १ चमचा किचन किंग मसाला, १ चमचा लाल तिखट, चवीसाठी मीठ, तेल किंवा लोणी.

कृती

टोमॅटो, भोपळी मिरच्या व्यवस्थित चौकोनी चिरून घ्या. दही, लसूण पेस्ट, अननसाचा रस, धने-जिरे पावडर, किचन किंग मसाला, तिखट, मीठ हे एकत्र करून त्याचे छान मिश्रण बनवून घ्या. हे मिश्रण चिकनचे, अननस, भोपळी मिरची आणि टोमॅटोच्या फोडींना लावून घ्या. मुरण्यासाठी तासभर फ्रीजमध्ये ठेवा. बाहेर काढून बार्बेक्यूच्या कामटय़ांना खोचून घ्या. आणि तेल किंवा लोणी लावून छानपैकी भाजा. सॅलडबरोबर खायला घ्या.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on February 13, 2019 12:09 am

Web Title: chicken pineapple kebab recipe