16 July 2020

News Flash

स्वादिष्ट सामिष : चिकन तेरियाकी

आता हे मुरवलेले चिकन मैद्यात घोळून दोन्ही बाजूंनी छान ग्रील करून घ्या.

दीपा पाटील

साहित्य

२ बोनलेस चिकन ब्रेस्ट, ३ चमचे मध, ४ चमचे सोया सॉस, अर्धा कप संत्र्याचा रस, २ चमचे तीळाचं तेल, १ इंच आले, १ चमचा बटर, १ चमचा भाजलेले तीळ, कांद्याच्या २ हिरव्या पाती, २ चमचे मैदा.

कृती

एका पातेल्यात चिकन घ्या. ते व्यवस्थित स्वच्छ करून त्याचे तुकडे करून घ्या. आता मैदा सोडून बाकीचे जिन्नस चिकनमध्ये मिसळा. आले किसून घ्या. कांदापात चिरून घ्या. चिकनला हे सर्व मिश्रण माखून मुरण्यासाठी ते फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवा. नंतर ग्रील पॅन गरम करून घ्या. आता हे मुरवलेले चिकन मैद्यात घोळून दोन्ही बाजूंनी छान ग्रील करून घ्या. पातेल्यात उरलेले सॉसचे मिश्रण या चिकनवर घालून ते त्यातच शिजवून घ्या. वेगळे पाणी घालू नका. शेवटी खाताना त्यावर कांदापात घालून खा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2019 1:13 am

Web Title: chicken teriyaki recipe zws 70
Next Stories
1 मौखिक आरोग्याकडे लक्ष
2 घरचा आयुर्वेद : तळपायांच्या भेगा
3 आजारांचे कुतूहल : सिलिअ‍ॅक डिसीज
Just Now!
X