20 March 2019

News Flash

मस्त मॉकटेल : चॉकलेट बनाना

सजावटीसाठी चॉकलेटही किसून घालता येईल. बनवल्यावर लगेचच गट्टम करा.

साहित्य

१ ताजे किंवा गोठवलेलं केळं, १कप चॉकलेट आइसक्रीम, १चमचा चॉकलेट सिरप, अर्धा कप बर्फाचा चुरा.

कृती

केळ्याच्या फोडी करा. ब्लेंडरमध्ये फोडी, आइसक्रीम आणि चॉकलेट सिरप घालून ते छान फिरवून घ्या. गुळगुळीत झाल्यावर थांबा. एका पेल्यामध्ये बर्फाचा चुरा भरा. त्यावर हे मिश्रण ओता. यावर सजावटीसाठी चॉकलेटही किसून घालता येईल. बनवल्यावर लगेचच गट्टम करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on June 13, 2018 12:56 am

Web Title: chocolate mocktail