News Flash

टेस्टी टिफिन : मका कटलेट

भात थोडासा मऊ हवा. जर फडफडीत भात असेल तर तो थोडा मळून किंवा कुकरला परत थोडा शिजवून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू साटम

बरेचदा आपल्याकडे भात उरतो. मग त्याचे काय करावे, हा प्रश्न पडतो. अशा वेळी थोडेसे डोके चालवत, या भातात आणखी काही जिन्नस मिसळले की एखादा मस्त पदार्थ तयार होतो. असाच एक पदार्थ म्हणजे मका कटलेट.

साहित्य :

* उरलेला भात

* उकडलेले मक्याचे दाणे

* गरम मसाला

* उकडलेला बटाटा

* लिंबूरस

* मीठ

* साखर,

* ब्रेडचा चुरा

* तेल.

कृती

भात थोडासा मऊ हवा. जर फडफडीत भात असेल तर तो थोडा मळून किंवा कुकरला परत थोडा शिजवून घ्या. मक्याचे दाणे, बटाटे, भात, लिंबूरस, मीठ, साखर आणि गरम मसाला एकत्र करून छान मळून घ्या. आता या मिश्रणाचे छोटे गोळे करा. ब्रेडच्या चुऱ्यामध्ये ते घोळवून तव्यावर लालसर रंगावर तळून किंवा भाजून घ्या.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:09 am

Web Title: corn cutlet recipe abn 97
Next Stories
1 शहरशेती : कोबी
2 पाऊस आणि ट्विटर
3 घरातलं विज्ञान : पेनची उत्क्रांती
Just Now!
X