News Flash

स्वादिष्ट सामिष : खेकडा बॉम्ब

बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ घालून या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करावेत.

दीपा पाटील

साहित्य

१ कपभरून क्रॅब मीट,  अर्धा कप ब्रेडचा चुरा, १ फेटलेले अंडे, पाव चमचे मिरपूड, १ चमचा मेयोनिज, १ चमचा मोहरी पूड, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा सोया सॉस, मीठ, तेल.

कृती

खेकडय़ातील मांस काढून घ्यावे. नंतर त्यात ब्रेडचा चुरा, मिरपूड, मेयोनिज, मोहरी पूड, सोया सॉस घालून चांगले एकत्र करावे. त्यानंतर यात अंडे फेटून टाकावे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ घालून या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करावेत. गरम तेलात ते लालसर तळून काढावे. गरमागरम खेकडा बॉम्ब तयार आहेत.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक : Array

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:41 am

Web Title: crab bombs recipe zws 70
Next Stories
1 चालणे, जॉगिंग की धावणे?
2 राहा फिट : निवांत झोपेची सात सूत्रे
3 योगस्नेह : शीतली प्राणायाम
Just Now!
X