शेफ नीलेश लिमये

साहित्य

*  ३-४ काकडय़ा,

* ४-५ लाल मुळे,

*  थोडी शेपूची पाने,

* २चमचे क्रीम,

* मीठ, मिरपूड,

*  चिली सॉस,

* चिली फ्लेक्स.

कृती :

काकडीच्या पातळ चकत्या करा. म्हणजे गोल गोल हं. यानंतर मुळ्याच्याही तशाच चकत्या करून घ्या. शेपूची पानंही अगदी बारीक चिरून घ्या. क्रीम फेटून त्यात मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स व चिली सॉस घाला. सगळ्याची छान चव लागेल अशा प्रकारे हे जिन्नस ड्रेसिंगमध्ये एकत्र करून घ्या.

आता एका मोठय़ा वाडग्यात काकडी, मुळ्याचे तुकडे घ्या. त्यावर छानपैकी ड्रेसिंग घाला. शेपूची पानं वरून पेरा. चिली फ्लेक्सनी सजवा. हे सॅलड फ्रीजमध्ये थंड करून मग छानपैकी गारेगार सव्‍‌र्ह करा!

nilesh@chefneel.com