18 October 2019

News Flash

टेस्टी टिफिन : आमटीचे धपाटे

आमटीत जर शेंगा वगैरे असतील तर त्याआधी काढून घ्या. आता त्यात थोडे पाणी घालून पातळसर करा आणि उकळत ठेवा.

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू साटम

साहित्य :

उरलेली आमटी, कोणतेही पीठ (कणीक, ज्वारी-बाजरी पीठ, थालिपीठ भाजणी किंवा तांदळाचे पीठ), तिखट, मीठ, जिरे पूड, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर.

कृती

आमटीत जर शेंगा वगैरे असतील तर त्याआधी काढून घ्या. आता त्यात थोडे पाणी घालून पातळसर करा आणि उकळत ठेवा. आता जे पीठ वापरणार आहात ते या आमटीत घाला. सोबतच तिखट, मीठ, जिरे पूड घाला. हिरवी मिरची, आले, कोथिंबीर वाटून घ्या. हे वाटण आमटीच्या मिश्रणात घाला. आता या मिश्रणाची मोदकाच्या पिठाप्रमाणे उकड करून घ्या आणि तेलाचा हात लावून मळून घ्या. याचे धपाटे करून तेलावर खमंग शेकवून घ्या.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on April 5, 2019 12:05 am

Web Title: dhapate recipe article