दीपा पाटील

साहित्य

* नूडल्स आणि नूडल्स मसाला, ४ अंडी, अर्धी वाटी चिरलेला कोबी, अर्धी वाटी चिरलेले गाजर, पाव वाटी उलपात (कांदा पात), पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ चमचे कॉर्नफ्लोर, २ चमचे मैदा, मीठ आणि तळण्यासाठी तेल.

*कृती

आधी अंडी उकडून सोलून घ्या. थोडय़ा नूडल्सही शिजवून घ्या. भाज्या अगदी बारीक चिरल्या असतील असे पाहा. आता गाजर, कोबी, कोथिंबीर आणि उलपात (कांदा पात) एकत्र करा. त्यात मीठ, नूडल्स मसाला, कॉर्नफ्लोर आणि उकडलेल्या नूडल्स घाला. एकीकडे मैद्यामध्ये थोडे पाणी घालून त्याचे भज्यांसारखे पातळ पीठ तयार करा. न शिजवलेल्या नूडल्सचा चुरा करा. शिजवलेल्या नूडल्सच्या सारणाची वाटी करून त्यात उकडलेले अंडे ठेवा. हे अंडे मैद्याच्या मिश्रणात बुडवून घ्या आणि न शिजवलेल्या नूडल्सच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्या. आता उकळत्या तेलात हे अंडे सोडा. मस्तपैकी खरपूस तळून घ्या. वरती चुरचुरीत नूडल्सचा थर आतमध्ये भाज्या आणि नूडल्सचे आवरण आणि त्याच्या आत उकडलेले अंडे असा हा प्रकार खायला एकदम मस्त लागतो.