ज्योती चौधरी-मलिक

साहित्य

६ उकडलेली अंडी, २ मध्यम आकाराचे कांदे, २ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ चमचे आले-लसणाचे वाटण, २ चमचे तिखट, १ वाटी चिरलेली कोथिंबिर, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर, हळद, धणे पूड, जिरे पूड अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ, २ चमचे तेल

कृती

प्रत्येक अंडय़ाचे ४ काप करावे किंवा चिरा द्याव्या. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात आले-लसूण वाटण घालून परतावे. मग अर्धी वाटी कोथिंबिर घालावी. त्यात थोडा चिरलेला कांदा घालून परतावे. आता यात तिखट आणि सर्व कोरडय़ा मसाल्यांचे पूड घालून चांगले परतून घ्यावे. आता उरलेला कांदा आणि टोमॅटो घालून परतावे. अंडय़ाचे तुकडे घालावे. चवीनुसार मीठ घालावे. शेवटी उरलेली अर्धी वाटी कोथिंबिर घालावी.