16 January 2019

News Flash

न्यारी न्याहारी : फरसाण पॅटिस

रामध्ये असलेला पिझ्झा मसाला, चाट मसाला असे काहीही चालू शकते.

शुभा प्रभू-साटम

कधी कधी घरात अक्षरश: ठणठणाट असतो. त्याच वेळी मुलांनाही डब्याला काहीतरी चटपटीत हवं असतं. कधी नाश्त्यालाच कुणी पाहुणे येऊन थडकतात. मग अशा वेळी हमखास मदतीला येणारा हा पदार्थ.

साहित्य – उरलेसुरले फरसाण, चिवडा, शेव, चकली. यात खारी बिस्कीट, टोस्ट, बटर असं काहीही असू शकतं. शिजवलेला भात आणि बटाटे, आले, लसूण, गरम मसाला, सॉस, मीठ, साखर.

कृती – फरसाण, चिवडा, शेव, खारी बिस्किट, टोस्ट, बटर यापैकी जे काही उरले असेल ते सर्व मिळून मिक्सरमधून त्याची छान पूड करून घ्यावी. आलं-लसूण वाटून घ्यावं. शिजवलेला भात आणि बटाटे कुस्करून घ्यावेत. त्यात ही फरसाण पूड एकत्र करून घ्यावी. आता यामध्ये गरम मसाला, मीठ आणि चवीपुरती साखर घालावी. याचे छान चपटे वडे तळून घ्यावेत. सॉससोबत गरमागरम गट्टम करावेत. गरम मसाला नसेल तरी हरकत नाही. घरामध्ये असलेला पिझ्झा मसाला, चाट मसाला असे काहीही चालू शकते.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on June 14, 2018 12:52 am

Web Title: farsan patties