X

खाद्यवारसा : पाच कडधान्यांची उसळ

सगळी कडधान्यं सकाळी स्वच्छ धुऊन भिजत घाला. रात्री उपसून चाळणीत झाकून ठेवा.

ज्योती चौधरी-मलिक

साहित्य :

पाव कप मूग, पाव कप मटकी, २ टेबलस्पून वाटाणे, २ टेबलस्पून काबुली चणे, १ टेबलस्पून मसूर, २ टेबलस्पून चवळी, १ कप जाडसर चौकोनी चिरलेला कांदा, १ कप बारीक चिरलेला टोमॅटो, १ अख्खा लसूण, १ इंच आलं, ५-६ आमसुलं (कोकम), २ तमालपत्र, १ इंच दालचिनीचा तुकडा, १०-१२ मेथी दाणे, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून हिंग, ८-१० कढीपत्त्याची पानं, १ टीस्पून हळद, २ टीस्पून लाल मिरची पूड,  १/३ कप तेल, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून सैंधव, जाडे मीठ चवीनुसार.

कृती :

सगळी कडधान्यं सकाळी स्वच्छ धुऊन भिजत घाला. रात्री उपसून चाळणीत झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उसळ करण्यापूर्वी पुन्हा एकदा धुऊन घ्या.  कढईत तेल तापले की मोहरी घाला. मोहरी तडतडली की तमालपत्र, दालचिनी, मेथी दाणे, जिरे, हिंग, कढीपत्ता घाला. आता फोडणीत कांदा आणि जाडसर कुटलेलं आलं लसूण घाला. आणि मऊ होईपर्यंत परतवून घ्या. त्यावर टोमॅटो घालून तोही परतवून घ्या. आता हळद, लाल मिरची पूड घाला आणि नीट हलवून घ्या. यानंतर व्यवस्थित धुतलेली कडधान्यं घालून नीट हलवून घ्या. झाकण ठेवून एक वाफ काढा. एकीकडे २ ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी तापल्यावर ते उसळीत घाला. आता त्यात आमसूलही घाला. चांगली उकळी फुटल्यावर सैंधव आणि मीठ घाला. उसळ शिजल्यावर गॅस बंद करून वरून कोथिंबीर घाला.