X

फ्लॉवर आणि ब्रोकोली सॅलड

फ्लॉवर आणि ब्रोकोली स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. ते उकळत्या पाण्यातून काढून लगेचच थंड पाण्यात टाकावेत.

शेफ नीलेश लिमये

साहित्य

चीझ सॉससाठी – १ चमचा प्रोसेस्ड चीझ, २ चमचे क्रीम, १ चमचा मेयोनिज, चवीपुरते मीठ, मिरपूड आणि चिली फ्लेक्स.

कृती

फ्लॉवर आणि ब्रोकोली स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करून घ्यावेत. ते उकळत्या पाण्यातून काढून लगेचच थंड पाण्यात टाकावेत. म्हणजे अर्धकच्चे शिजतील. कारण आपल्याला संपूर्ण शिजलेली भाजी करायचीच नाही.  एका भांडय़ामध्ये क्रीम घालून ते मायक्रोवेव्हमधून थोडे गरम करून घ्यावे. त्यात चीझ किसून घालावे. मेयोनिज घालावे आणि मीठ, मिरपूड घालून हे नीट मिसळून घ्यावे. आता आपला चीझ सॉस तयार झाला. एका छानशा नक्षीदार खोलगट बशीमध्ये अर्धकच्ची शिजवलेली फ्लॉवर आणि ब्रोकोली काढून घ्यावी. त्यावर हा चीझ सॉस माखावा आणि वर चिली फ्लेक्स भुरभुरून हे थंडगार सॅलड खायला द्यावे.

फ्लॉवरची भाजी दिलीत तर मुले खात नाहीत. पण हे चविष्ट आणि दिसायला छान असलेली रंगीबेरंगी सॅलड नक्कीच खातील. आवडत असल्यास यात रंगीत सिमला मिरची, टोमॅटो सॉस हे घटक घातलेत तर त्याचा रंग अधिकच खुलेल.

nilesh@chefneel.com