08 December 2019

News Flash

टेस्टी टिफिन : फ्लॉवर सॅण्डविच

लसूण सोलून बारीक चिरून घ्या. मक्याचे दाणे उकडवून घ्या. जरासे ठेचून घ्या.

(संग्रहित छायाचित्र)

शुभा प्रभू साटम

साहित्य :

*  चीझ

*  पालक

*  मक्याचे दाणे

*   फ्लॉवर

*  लसूण

*  लोणी

*  मीठ

*  मिरपूड

*  ब्रेड

कृती

लसूण सोलून बारीक चिरून घ्या. मक्याचे दाणे उकडवून घ्या. जरासे ठेचून घ्या. पालक आणि फ्लॉवरही बारीक चिरून थोडय़ाशा शिजवून घ्या. आता लोण्यावर लसूण परतून घ्या आणि वेगळी काढून ठेवा. पालक, फ्लॉवर आणि मक्याचे दाणे त्याच लोण्यावर परता. हे मिश्रण आचेवरून खाली उतरवा. त्यामध्ये परतलेली लसूण, चीझ, मिरपूड, मीठ हे सगळं व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण ब्रेडमध्ये भरून भाजून घ्या. तुमचं सॅण्डविच तयार आहे.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on July 26, 2019 12:08 am

Web Title: flower sandwich recipe abn 97
Just Now!
X