नीलेश लिमये nilesh@chefneel.com

साहित्य – पाव किलो सोललेली कोळंबी, ३०० मिली तेल, १ सेलरी काडी, अर्धा चमचा तिरफळे, बिया काढलेल्या ९-१० लाल सुक्या मिरच्या, २-३ लसूण पाकळ्या, ५ काडय़ा कांद्याची पात, ७५ ग्रॅम भाजलेले काजू, १ चमचा वाइन, १ चमचा सोया सॉस.

मॅरिनेशनसाठी – पाव चमचा मीठ, २ चमचे कॉर्न स्टार्च, १ चमचा अंडय़ातले पांढरे, १ चमचा चायनीज राइस वाइन.

कृती

कृती – एका भांडय़ात कोळंबीच्या लांब फोडी करून घ्याव्यात. मॅरिनेशनसाठीचे साहित्य यात घालून ही कोळंबी मुरवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्यावी. मिरच्या आणि कांदापात चिरून घ्यावी. कढईत तेल गरम करावे. त्यात मुरवत ठेवलेल्या कोळंबीच्या फोडी चांगल्या परतून घ्याव्यात. कोळंबी शिजल्यावर त्यात १ चमचा वाइन आणि सोया सॉस घालून परतावे. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल चांगले गरम झाले की त्यात मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी घालावी व चांगले परतवून घ्यावे. कोळंबी शिजल्यावर त्यात १ टीस्पून वाइन आणि सोया सॉस घालून परतावे. बाकीचे सर्व साहित्य घालून सव्‍‌र्ह करावे.