05 August 2020

News Flash

पूर्णब्रह्म : कोळंबीचे चिलचिले

कांदे बारीक कापून घ्या. सुकं खोबरं भाजून बारीक वाटून घ्या. कोळंबी स्वच्छ धुवून घ्या.

दीपा पाटील

साहित्य

पाव किलो कोळंबी, ४-५ मोठे कांदे, २ मोठे चमचे आलं-लसूण वाटण, २ मोठे चमचे लाल तिखट, १ मोठा चमचा गरम मसाला, अर्धा मोठा चमचा हळद, २ मोठे चमचे चिंचेचा कोळ, ४ मोठे चमचे सुकं खोबरं, अर्धी वाटी तेल, मीठ चवीनुसार

कृती

कांदे बारीक कापून घ्या. सुकं खोबरं भाजून बारीक वाटून घ्या. कोळंबी स्वच्छ धुवून घ्या. कढईत तेल गरम करा व त्यात कांदा परतवा. नंतर त्यात आलं-लसूण वाटण टाका. नंतर हळद, लाल तिखट टाकून थोडे परतवून कोळंबी टाका. नंतर सुकं खोबरं, चिंचेचा कोळ, मीठ टाकून एक वाफ आणा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 4:01 am

Web Title: frown recipes for loksatta readers zws 70
Next Stories
1 गुंतवणुकीचा ‘स्मार्ट’ मार्ग
2 ‘टीव्ही’चे रिमोट कंट्रोल कसे काम करते?
3 एका मिनिटात रसाचा आनंद
Just Now!
X