16 January 2019

News Flash

सॅलड सदाबहार : फ्रूट सॅलड

पुदिन्याच्या पानांनी सजावट करा.

साहित्य

पिकलेल्या केशरी आंब्याचे चौकोनी काप २ कप भरून , ब्लू-ब्लॅक बेरीज १ कप, स्ट्रॉबेरीज १, स्वीट कॉर्न १ कप, कीवी फळाचे चौकोनी काप १ कप, १ इंच बटर क्यूब, २ चमचे साखर, ४ चमचे संत्र्याचा रस, दीड कप ताजी साय

कृती :

प्रथम नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर बटर व साखर एकत्रित विरघळू द्या. साखरेचे कॅरॅमल झाले की त्यात संत्र्याचा रस घालून ते एकत्र करा आणि गॅस बंद करा. त्यावर कीवीचे तुकडे हलके परतून घ्या.

एका काचेच्या पसरट भांडय़ात आंब्याचे काप, ब्लू बेरीज, स्ट्रॉबेरीजचे काप, स्वीट कॉर्न, कॅरॅमलमध्ये हलकेसे परतून घेतलेले कीवीचे काप व ताजी साय हे सगळे एकत्र करा. पुदिन्याच्या पानांनी सजावट करा.

nilesh@chefneel.com

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on April 14, 2018 12:33 am

Web Title: fruit salad recipe salad special recipe